चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...
चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद ।
पत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले ।
कलम तपसील । गावची आबादी करावी ॥ १ ॥
कामक्रोध हे रयत त्यांचे ऎकू नये । कलम तपसील ॥ २ ॥
आशा मनषा यांची संगत धरू नये ।कलम० ॥ ३ ॥
सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे ।कलम तपसील ॥ ४ ॥
शांतिक्षमादया असो देणे ।कलम तपसील ॥ ५ ॥
ज्ञान वैराग्य - भजनपूजनी आदर ठेवणे ।कलम तपसील ॥ ६ ॥
ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले । तुम्ही तों ते विसरून सदरींचे कलमास न अनुसरून । वाईट वागणुकीचा रस्ता काढला । तो तुम्हास परिणामी बाधक होईल । सावध रहाणे । एका जनार्दनी शरण । हे आशीर्वादपत्र