Get it on Google Play
Download on the App Store

डौर

ऐका गाये साधु सज्जन हो । महंत महाजन हो । मननसील मुनिजन हो । योगा सज्ञान हो सावध ऐका ॥ १ ॥

वैकुंठराणे राज्यधर । चिन्मात्रैक राज्यकुमर । निजज्ञानीवेव्हारे थोर थोर । नित्य सादर ते आइका ॥ २ ॥

विनवी जनार्दनाचा एका । सेवितो तुमच्या चरण पियुखा । उजळल्या निजात्मसुखा । डौर वाजऊनियां देखा । डौरकार पैं जाहले ॥ ३ ॥

उठूनियां ब्रह्ममूहुर्ती । काय करावें निश्चितीं । तें ऐका तुम्हांप्रती । यथा निगुती सांगेन ॥ ४ ॥

डौरनाद । खुडमुड । कर्म मार्गी स्मृति ॥

॥ श्लोक ॥

गृहीतशिश्नश्चोत्थाय जगाम दिशउत्तरम् ।

कर्ममार्गी विधिती । शिश्न धरूनि डावे हातीं । दुर्वा घेऊनि उजवे हातीं । उत्तर दिशेप्रती । हागो जावें ॥ ५ ॥

ऐसे मुहुर्तीच हागों लागले । ते हागणवटीसी अडकले । ब्राह्म मुहुर्ती साधु भले । काय करूं लागले तें ऐक ॥ ज्ञानमार्गीं स्मृति ॥

श्लोक

ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय । चिंतयेदात्मनो हितम्

आत्महित चिंतन । मज व्हावें धन धान्य । मज व्हावें मान्यता मान्य । भूत भविष्य वर्तमान । हें ज्ञान मज व्हावें ॥ ७ ॥

मज व्हावें वस्त्र कलत्र । मज व्हावें वंशीं पुत्र । हें चिंतन निरंतर । तें नव्हे साचार । आत्महित ॥ ८ ॥

डुगडुग । हें चिंतन करुनी काये । थितें आयुष्य व्यर्थ जाये । जें चिंतावें तें अदृष्टीं आहे । हितचिंतन पाहे । आनचि असे ॥ ९ ॥

तें कैसें गा ये डौरकारा वाईक बोल । द्रव्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान । ज्ञेय ज्ञाता ज्ञान । यांहीहुनीं मी भिन्न । ऐसी चिंता गा ये महानुभाव हो

॥ १० ॥

मी हातापायापरता । मी गुणत्रया वरुता । चहूं वाचांहुनी तत्त्वतां । अतीत हो सर्वथा । मीची मी स्वयें ॥ ११ ॥

कर्म धर्म इंद्रिय सत्ता । माझेनी चालली तत्त्वतां । परी मी सर्व कर्मधर्मापरता । करूनि अकर्ता मीची मी स्वयें ॥ १२ ॥

जीव शीव ऐशी वार्ता । तें माझेंचि स्वरूप वस्तुता । जीव शिवा नातळता । प्रकृती पुरुषा परता । मीचि मी स्वयें ॥ १३ ॥

देह जो का पावे मरण । त्यामाजीं मी न मरे तो आपण । जेथें नाहीं मी तूंपण । तें स्वरूप पूर्ण मीचि मी स्वयें ॥ १४ ॥

ऐसें करी जो चिंतन । त्याच्या मरणासीच ये मरण । आंगीं न लगे जन्मबंधन । एका जनार्दन निजवाक्य ॥ १५ ॥

डौर नाद सुख आनंद वर्तेल ये चोहटीं । धादान्त वेदान्त सिद्धान्त । बोल बोलोनि गेले बहुत । आतां मी आलों भोगान्त । माझा वचनार्थ सावध ऐका ॥ १६ ॥

धादान्त बाईंक डौरकाराचे । वेदान्त वाईक पंडितांचे । सिद्धान्त वाईक ज्योतिषाचे । आणि भोगान्त वाईक माझें । सावध ऐका सज्ञान ज्ञाते हो ॥ १७ ॥

डौरकाराचे बोल । विचारिती खोलाचे खोल । तें आशेनें केलें केवळ फोल । विश्वासाची बोल गेलो तें हें ऐका ॥ १८ ॥

दान देतो महा स्वाड । नेदी तो महा द्वाड । हें बोलणें अतिशय वाड । परी लुलु करी चाड तें मज दान द्यावें ॥ १९ ॥

ते लुलूनें काय केलें । बोलिलें तितुकें वायां गेलें । वायां जाऊनि गोविलें । डौरकारा दिधलें काळमुखपन ॥ २० ॥

डौर नाद डुगडुग । धरूनि प्रतिष्ठेचें बंड । बोल बोलती प्रचंड । आशा वाढविती विंतड । तेव्हांच त्याचें काळें तोंड । ऐसे काळतोंडें उदंड । जगीं फिरताती

॥ २१ ॥

ऐसी आम्हा डौरकाराची मती । काळमुखें जगीं भीक मागती । त्याच्या डौराची नादस्थिती । ऐका तुम्हांप्रती सांगेन ॥ २२ ॥

॥ डौरनाद ॥ चडमुख चुडमुख चुडमुख । दुकमुक दुकमुक दुकमुक ॥ कुसकुस कुसकुस कुसकुस ॥ तळमळ तळमळ तळमळ ॥ खटपट खटपट खटपट ॥ बुडबुड बुडबुड बुडबुड ॥ खळबळ खळबळ खळबळ ॥ फुसफुस फुसफुस फुसफुस ॥ पटपट पटपट पटपट ॥ भुंगभुंग भुंगभुंग भुंगभुंग ॥

ऐशा नादाच्या कोटी । मग शंखनादें डौर उटी । हे नादाची मूळ नोष्टी । आतां वेदान्त परिपाठीं । सादर परिसा ॥ २३ ॥

झालिया वेदान्त व्युत्पत्ती । अवश्य व्हावी ब्रह्मप्राप्ती । तेथेंही गुणदोष उठती । ज्ञानगर्वे स्थिती नागवीं नाचे ॥ २४ ॥

वाचूनियां वेदान्त । पुढीलासी म्हणती धादान्त । आपण स्वयें अदत । गुणदोष पहात सर्वांचे ॥ २५ ॥

पंडिता पंडित देखोनि दिठी । क्रोधें गुरगुर करिती पोटीं । वरिवरी बोलती गोड गोष्टी । क्षुद्र दृष्टी ठेवुनी ॥ २६ ॥

वाग्वाद बांधोनियां गांठीं । पत्रावलंबन करिती हाटीं । ज्ञान विकिती पोटासाठीं । ऐसी वेदान्त्यांची गोष्टी । पंडित परिपाठीं । अन्योन्मुख जाली ॥ २७ ॥

आतां सिद्धान्त परिपाठीं । ज्योतिषी सांगे जे जे गोष्टी । साच दिसे परी ते खोटी । मिथ्या चाउटी ते ऐका ॥ २८ ॥

रवी सोम प्रती । मांसाच्या अंतीं । मंडळ साम्य समत्त्वा येती । सूर्या आड चंद्राची गती । जाण निश्चिती दिनद्वय ॥ २९ ॥

ते अमावस्येचे दिवशीम । जीवें जीता चंद्रासी । नष्टत्व स्थापिती ज्योतिषी । ते या लोकांसी सत्य माने ॥ ३० ॥

दृष्टी चंद्रासी नवाळी बहु । नष्ट चंद्रासी म्हणती कुहू । ऐसे मिथ्या बोलती बहू । करिती हा हा हु हु सिद्धान्त वक्ते ॥ ३१ ॥

अदृष्टें खावया नाहीं ज्यासी । ज्योतिषी सांगे ग्रहगति त्यासी । तेचि राशीच्या नांदत्यासी । म्हणती नवग्रह तुम्हांसी । सुप्रसन्न सदा ॥ ३२ ॥

ज्याची देखती अवदशा । त्यासी म्हणती क्रूर ग्रहदशा । जेथें देखतां लक्ष्मीविलासा । तेथें जन्म ग्रहदशा उंच म्हणती ॥ ३३ ॥

एवं वेदान्त सिद्धान्ताचिया गती । मिथ्या वचन सत्य म्हणती । तेणेंचि सभेमाजीं श्लाघती । जीविका वृत्ती लक्षुनी ॥ ३४ ॥

एवं धादान्त वेदान्त सिद्धान्त । तिहींचा दाविला मथितार्थ । आतां माझें बोलणें भोगान्त । तें तव या लोकांत रुचेना ॥ ३५ ॥

तरी कांही बोले चावटी । ते ऐका सादर गोष्टी । सभा देखूनियां मोठी । जो तो उठी बोलावया ॥ ३६ ॥

परी मज भोगान्तांच्या वाई का । तुम्हीं सादर होउनी आइका । धरुनी आपुलाला आवांका । निजात्मसुखालागुनी ॥ ३७ ॥

ये खेपे आले घरा गा ये राय हो । धरा आले धराल तरी ढवळा धरा । ढवळा धराल तरी मासा धरा । मास धराल तरी बांदी धरा । बांदी धराल तरी जातें धरा । जातें धरायाकारणें मेंढा धरा । मेंढा धराया कारणें बेटकुळी धरा । हीं अवघीं धरायाकारणें । अवश्य धरावें ग्रहण । ग्रहण धराल तरी जीवभावें धरा ।

आतां आलें म्हणजे काय । मळीयाचें आले तें आलें धरावें । कीं नाणें आलें तें आलें म्हणजे धरावें । कीं केणे आलें तें आलें धरावें । कोणते आलें धरावें । म्हणाल तरी सावधान ऐका गा ये बोधनिधि उदार चक्रवर्ती हो । मुळीयाचे आलें तें आलें । नव्हें केणें आलें तें आलें नव्हे । नाणें आलें तें आलें नव्हे । तरी मनुष्यदेहीं जें आयुष्य आलें तें आले धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो ॥

हें आले धरितां । अलभ्य लाभ ते हातां । सुरनर वंदिती माथां । तीर्थातीर्थ मागोम येती ॥ ३८ ॥

ऐसें हें आलें आलियावरी । घालूनि प्रपंच शिळेवरी । विषय चिंतेची मीठ मोहरी । ठेचा करी भलताची ॥ ३९ ॥

परी आल्याची एकी फोडी तरी । कोणी नेदी परमार्थावरी । यापरी आलें घरोघरीं । नरनारी नासिती ॥ ४० ॥

डुग डुग डुग । त्या आल्याच्या सात कातळी । उरल्या होत्या परिक्षिती जवळी । त्या अर्पुनी परमार्थ मेळीं । सुखाच्या सुखकल्लोळीं । जग निवविलें सुखसमेळीं श्रीभागवताची पाहे घातली । हे ख्याती केली परीक्षितीनें ॥ ४२ ॥

खड्‌वांगें आलें धरिलें देउनी जन्मसार्थक केलें । जन्ममरणाचे ठाव पुसिले । निजरूप केलें निजांगें ॥ ४३ ॥

हें दुर्लभ आलें आलियां घरां । जे घालिती देहममतेचा मातेरा । ठेंचा करिती विषयद्वारा । त्याच्या जन्ममरण वेरझारा न सरती ॥ ४४ ॥

म्हणाल आलें धरावें कैसें रीती । तरी वैराग्य विवेकें घ्यावें हातीं । सदा भगवद्भाव सर्वांभूतीं । एका जनार्दन करितां चित्तीं । निज निश्चिती आलें लाभे

॥ ४५ ॥

आलें धरिलें । आतां ढवळा धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो । ढवळा धरा जवळा । धरितां मार्ग प्रांजळा । धरितां ढवळ्याच्या कळा । आम्ही कळीकाळा नागवों ॥ ४६ ॥

ज्या ढवळ्यावरी आलें चालें । ज्या ढवळ्यावरी आलें मोलावलें । ज्या ढवळोनि आलें सरतें झालें । तो ढवळा भावबळें जीवेंसी धरा ॥ ४७ ॥

तरी ढवळा धरूं कापूस । कीं ढवळा धरूं राजहंस । कीं ढवळा करूं पारिजाची खोट । कीं ढवळा । धरूं काश्मिरीचा घट । कीं ढवळा कोण तो म्हणशील तरी स्पष्ट । सांगेन ऐका गा ये सज्ञान ज्ञाते हो । तरी ढवळा नव्हे रू कापूस । ढवळा नव्हे तो राजहंस । ढवळा नव्हे पारिजाचा खोट । ढवळा नव्हे काश्मिरिचा स्फटिक घट । तरी ढवळा जो निजधर्म चोखट । तिहीं लोकीं ॥

निजधर्म जो सोज्वळा । त्यासीच बोलिजे शुद्ध ढवळा । जो भागवतीं वाखाणिला । स्वयें रक्षिला परीक्षितीनें ॥ ४८ ॥

एक ढवळा धरिला खोटा । एक ढवळा धरिती उफराटा । एक ढवळा धरिती आव्हांटा । ऐशा ढवळ्याच्या चेष्टा न कराव्या हो राया ॥ ४९ ॥

खोटा उफराटा आडवाटा । एक ढवळा धरिती पोटा । हे बोलिल्या खटपटा । सांगेन स्पष्ट सावधान ऐका ॥ ५० ॥

कासीचा पोहा लुटिती । सात्त्विका ते नागविती । तेणें द्रव्य धर्म मिरविती । खोटा धर्म धरिती या नांव राया ॥ ५१ ॥

मारुनी धर्माच्या वाटा । लुटून दिन चोहटा । वाढविती धर्माचा फांटा । तो जाण खोटा धर्म राया ॥ ५२ ॥

यापरि धर्म खोटा । आतां ऐक धर्म उफराटा । धर्मचि लागे राया अधर्म वाटा । तेही निष्ठा अवधारी ॥ ५३ ॥

कन्या विक्रयें द्रव्य संचिती । गोविक्रय द्रव्य अर्जिती । हय विक्रयें द्रव्य जोडिती । तेधन निश्चिती अधर्म ॥ ५४ ॥

जेणें अधर्म धरूनि ताठा । मिरविती धर्माच्या खटपटा । या नांव धर्म उफराटा । तो धर्म लावी वाटा अधर्माचिया ॥ ५५ ॥

संन्यासी द्रव्य अर्जिती । तेणें द्रव्य धर्म करिती । देते घेते नरका जाती । तो धर्म निश्चिती अधर्म होय ॥ ५६ ॥

विवाह मुंजिक यज्ञ करिती । द्विजा धाराद ते द्रव्य संकल्पिती । ते मागतां न देती । द्विजा निर्भच्छिती धन मान दर्पे ॥ ५७ ॥

या परी धर्मनिष्ठा । करोनि धर्म करिती उफराटा । तो धर्म पडे आव्हांटा । त्याही चेष्टा अवधारा ॥ ५८ ॥

लौकिक वाढवावया महिमान । तुळ पुरुषें करिती दान । देहेविष्ठा मूत्राचें परिपूर्ण । धन त्यासमान जोखिती ॥ ५९ ॥

यापरी धर्मरूप धनाचें जिणें । जोखून विष्ठा मूत्रप्राय करणें । परि परमार्थाकारण कवडी देणे न संभवे ॥ ६० ॥

केवळ मिरवावया प्रतिष्ठा । धर्म मिरविती अनेक चेष्टा । तो धर्म बांधे वाचेचा चोहाटा । यापरि आव्हांटा घालिती धर्म ॥ ६१ ॥

काम्य बळ धर्म करिती । जप करवुनी द्विजा मजुरी देती । तेही पुरती न देती । यापरी धर्म स्थिति । आव्हांट सुती निजलाभे ॥ ६२ ॥

मातापित्याचे श्राद्धदिनीं । दक्षणानांवें घालिती पाणी । मग मागतां नेदिती ब्राह्मणीं । ते धर्माची निशाणी अधर्मी लागे ॥ ६३ ॥

खोटा आणि उफराटा । धर्म सांगितला आव्हांटा । धर्म वेंचे पोटा । तेही चेष्टा अवधारी राया ॥ ६४ ॥

आचाट मांडुनी धर्मस्थिती । तद्‌द्वारां द्रव्य उपार्जिती । सेखीं धर्मासी अंगोठा दाविती । द्रव्य वेंचिती उदरार्थ ॥ ६५ ॥

श्रीमंत यजमान आले देखती । तेव्हां अग्निहोत्रादि धूम्र काढिती । तेच काळीं अग्नि लाविती । येर्‍हवीं नांदती उंदीर तेथें ॥ ६६ ॥

यजमान पाठिमोरा जाल्या देख । मागें अग्निहोत्राची होय राख । यापरी सज्ञान लोक । उदरार्थ देख दाविती धर्म ॥ ६७ ॥

काशीयात्रेलागीं सबळ । नानापरी द्रव्य मेळविती पुष्कळ । तीर्थी लक्ष होय रुद्राचें फळ । घेऊनियां फळ अर्जिती धन ॥ ६८ ॥

एवं उभय दोषी धन अर्जिती । तेही यजमाना देशवृद्धी देती । ऐसा पोटालागीं धर्म धरिती । जाण गा निश्चित सज्ञान हो ॥ ६९ ॥

ऐसी ऐसी धर्मचेष्टा । तो धर्म भरला सन्निपात फाटा । शुद्ध धर्माची जे निष्ठा । ते कदा निष्ठा उपजों नेदी ॥ ७० ॥

शुद्ध धर्म जो सोज्वळ । त्यांते श्रीभागवत म्हणे ढवळ । तो चतुष्पाद धरावा सकळ । या नांव प्रांजळ परम धर्म ॥ ७१ ॥

यांसी प्रथमपाद ते धन । द्वितीयपाद तें वचन । तृतीयपाद ते कायिक जाण । मानसिक संपूर्ण तो चतुष्पाद ॥ ७२ ॥

मानसिक धर्मापुढें । धन वचन काय बापुडें । मानसिक धर्माचें बळ गाढें । तोडी रोकडे भवबंधा ॥ ७३ ॥

मानसिक धर्मास्थिती । होय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती । चार्‍ही मुक्ति पायां लागती । ऐसी धर्मस्थिती अगाध ॥ ७४ ॥

मानसिक धर्माची कोण स्थिती । जे भगवद्भाव सर्वांभूतीं । याहीवरुनी धर्माची गती । जाण निश्चिती असेना ॥ ७५ ॥

एका जनार्दनीं म्हणे । जनीजनार्दनीं मनीं पाहणें । हेंचि सकळ धर्माचें निज जिणें । संसाराचें धरणें समूळ उठी ॥ ७६ ॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । आतां मासा धरा गा । ये सज्ञान ज्ञाते हो । तरी मासा कोणता धरावा । काय जळींचा मासा तो धरावा । कीं सोन्याचा मासा तो मासा धरावा । कीं रुप्याचा मासा तो मासा धरावा । कीं दिवसाचा मासा तो मासा धरावा । कोणता मासा धरावा म्हणाल तरी सावधान ऐका । जळींचा मासा तो मासा नव्हे । सोन्याचा मासा तो मासा नव्हे । रुप्याचा मासा तो मासा नव्हे । दिवसांचा मासा तो मासा नव्हे ।

जो अतिशय चळवळ । अत्यंत जो चपळ । धरितां न धरवे निश्चळ । तो मनोमासा केवळ । धरूनि राखा ॥ ७७ ॥

चतुर्भुजाच्या गळीं । कां हरिभक्तीच्या जळीं । भगवद्भाव करतळीं । विवेकें महाबळीं । मनोमासा धरिती ॥ ७८ ॥

हा मनोमासा धरिल्या पाठी । घरा वैकुंठ स्वयें ये भेटी । अर्धोंदयें कपिलाषष्ठी । चरणांगुष्ठी पावन ॥ ७९ ॥

मनों मासा लागल्या हातीं । जीवासी वरी ब्रह्मप्राप्ती । एका जनार्दन धरितां चित्तीं । चारी मुक्ती वोळगण्या ॥ ८० ॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । आतां बांदी धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो । तरी बांदी कोणती धरावी म्हणाल तरी सावध ऐका । काय तुरकाची बांदी धरावी । कीं रेशमाची बांदी धरावी । कीं पेवाची बांदी धरावी । कीं कडब्याची बांदी धरावी । कोणते बांदी धरावी म्हणाल तरी सावध ऐका । तरी तुरकाची बांदी ते बांदी नव्हे । रेशमाची बांदी ते बांदी नव्हे । पेवाची बांदी ते बांदी नव्हे । कडब्याची बांदी ते बांदी नव्हे ।

जे त्यासी त्यास हात नेदी । ते धरा इच्छा बांदी । जे कामक्रोधलाभ संधी । तिचे त्रिशुद्धी लागले धगड ॥ ८१ ॥

घरीं क्षणभरी न राहे । मना आले त्या सवेंचि जाय । न खाये ते हटीची खाये । न रिघावें तेथें राहे । बळेंचि रिघोनी ॥ ८२ ॥

तरी ईसी नैराश्येची घाली बेडी । आणिक बोधाचे चाबुक वरी झोडी । निरपेक्षेनें दांत पाडी । तैंच पहिली खोडी सांडील ॥ ८३ ॥

मग ते इच्छा नैराश्ये उठी । परमानंदीं पाडी मिठी । एका जनार्दनाचे भेटी । ब्रह्मानंद सृष्टि हेलावे ॥ ८४ ॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । बांदी धरिली । आतां जातें धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो । जातें धरावें तें कोण । काय दळीतें जातें तें जातें धरावें । कीं दिनमान जातें तें जातें धरावें । कीं आभाळ जातें ते जातें धरावें । जातें धरावें तें कोण म्हणाल तरी ऐका गा राये हो । तरी दळितें जातें तें जातें नोहे । दिनमान जातें तें जातें नोहे । आभाळ जातें तें जातें नोहे । तरी मनुष्यदेहे आयुष्य जातें तें जातें धरा गा सज्ञान ज्ञाते हो ॥

या मनुष्यदेहाची एक घडी । न मिळे वेंचिताम लक्ष कोडी । ते नासिती प्रपंचाचिये वोढी । ते जोडिली जोडी महामूर्खत्वें ॥ ८५ ॥

मनुष्यदेहे राखावा कैशा रीती । तरी सदा भगवद्भाव सर्वांभूतीं । तेणें तात्काळ ब्रह्मप्राप्ती । नाशे कल्पांतीं दिसेना ॥ ८६ ॥

एका जनार्दन म्हणे । मनुष्यदेहाचेनि अनुसंधानें । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होणें । जिणें मरणें त्या नाहीं ॥ ८७ ॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । बांदी धरिली । जातें धरिलें । आतां मेंढा धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो । मेंढा धरावा तो काय । शेळीचा मेंढा धरावा । कीं मेंढीचा मेंढा धरावा । कीं पाळिता मेंढा धरावा । कोणता मेंढा धरावा म्हणाल तरी सावधान ऐका । तरी शेळीचा मेंढा तो मेंढा नव्हे । मेंढीचा मेंढा तो मेंढा नव्हे । पाळिता मेंढा तो मेंढा नव्हे । तरी वोटीचा मेंढा तो मेंढा धरा गा सज्ञान ज्ञाते जो जो काळ रात्रीचा एडका । सिगेविण बोडका । आंधारी हाणे थडका । तो एडका दृढ धरा ॥ ८८ ॥

धराल तरी मुंडी मुरगाळून धरा । अहर्निशी जतन करा । तेणें वैकुंठीचें राज्य येईल घरा । एका जनार्दनीं निर्धारा । सुरनर वंद्य तो होय ॥ ८९ ॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । बांदी धरिली । जाते धरिलें । मेंढा धरिला । आतां बेटकुळी धरा गा सज्ञान ज्ञाते हो । बेटकुळी धरावी ते कोण काय नदीची बेटकुळी धरावी । कीं तळ्याची बेटकुळी धरावी । कीं आडाची बेटकुळी धरावी । कोणती बेटकुळी धरावी । म्हणाल तरी सावधान ऐका । तरी नदी बेटकुळी ती बेटकुळी नव्हे । तळ्याची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे । आडाची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे । तरी सजेची बेटकुळी धरा । धराल तरी वेगळीच धरा । तिच्या पुटपुटेच्या झणत्कारा । भाळाल झणी ॥ ९० ॥

ते बेटकुळी धरितां । चारी मुक्ती येती हातां । एका जनार्दन धरितां । ब्रह्म सायुज्यत घर रिघे ॥ ११ ॥

आलें धरिलें । ढवळा धरिला । मासा धरिला । बांदी धरिली । जातें धरिलें । मेंढा धरिला । बेटकुळी धरिली । आता ग्रहण धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो । तरी ग्रहण धरावें कोण । रविग्रहण कीं चंद्रग्रहण । अथवा धरावें ग्रहणीं ग्रहण । ग्रह लक्षण तें कैसें ।

या काहीं ग्रहणांहूनि भिन्न । धरी ते ग्रहण आहे आन । ग्रहणी ग्रहण तें निंद्य पूर्ण । रविचंद्र ग्रहण ते मिथ्या ॥ ९२ ॥

साठी सहस्त्र राहूची सींमा । लक्ष भानु दोनी लक्ष चंद्रमा । तें मंडळ साम्य येती समा । ते राहु रवि सोमा स्पर्श नाहीं ॥ ९३ ॥

ज्योतिषी सांगे ग्रहण गोष्टी । ते गोष्टी समूळ खोटी । पर्व ग्रास देखिजे दृष्टी । ते चाली उफराटी लक्षवेना ॥ ९४ ॥

रवी राहूसी नाहीं भेटी । त्याच्या सर्व ग्रासांच्या शेवटीं । ज्योतिष्य सांगे मुख सपाटीं । तेणेंचि बोंब उठी जगामाजीं ॥ ९५ ॥

राहूचि शाम प्रतिमा । ते कदा न दिसे माजीं व्योमा । त्यासी प्रकाशी रवि चंद्रमा । विपरीत प्रेमा तेणें केला ॥ ९६ ॥

राहु गिळितो जैं सूर्यासी । तैं सूर्य जाळीतां त्याच्या मुखासी । सूर्ये प्रकाशिलें राहूसी । म्हणोनि जगासी तो दिसे ॥ ९७ ॥

रविचंद्र प्रकाशिती राहूसी । तेणें गिळिलें म्हणती त्यासी । हें विपरीत सांगे ज्योतिषी । तें या लोकांसी सत्य माने ॥ ९८ ॥

यापरी गा रविचंद्रग्रहण । विपरीतार्थे मिथ्या पूर्ण । तैसेंचि गा ग्रहणीं ग्रहण । त्याज्य जाण निंद्यत्वें ॥ ९९ ॥

अस्थि मांस रुधिर चर्म । विष्ठा मूत्र पूर्ण काम । स्त्री पाहतां निंद्य दह्र्म । परम अधर्म ग्रहणी ग्रहण ॥ १०० ॥

रविचंद्र ग्रहणीं मुक्त स्नान । करितां देख सकळ जन । ग्रहणीं ग्रहणे मुक्त स्नान । सहसा सज्ञान न शकती करूं ॥ १ ॥

ग्रहणीं ग्रहणापासूनि सुटला । ऐसा न देखों दादुला । जो तो सर्वग्रासें गिळिला । जन नागवला ग्रहणीं ग्रहणें ॥ २ ॥

एवं ग्रहण त्रैलक्षण । तुज म्यां सांगितलें संपूर्ण । गुरुआज्ञा तें मुख्य ग्रहण । सर्वी जाण धरावें ॥ ३ ॥

एका ग्रहण स्पर्श होय । एकाचें तें अंगोळ द्वय । एकाचें तें अंगुळ चतुष्टय । एकाचें तें पाहे पादमात्र ॥ ४ ॥

एकाचे तें अर्धग्रहण । एकाचें तें केवळ त्रिकोण । एकाचें तें बिंब पूर्ण । एकाचें जाण खग्रास ॥ ५ ॥

बिंब ग्रासुनी खग्रास केला । तोचि कर्माकर्मापासुनी सुटला । त्याचा भवपाश तुटला । पूर्ण विनटला गुरुग्रहणीं ॥ ६ ॥

गुरुग्रहणीं जो पूर्ण विनटला । तोचि ग्रहणीं ग्रहणापासूनि सुटला । तोचि काळाचे हाताहूनि निष्टला । तेणेंचि ग्रासिला कळिकाळ ॥ ७ ॥

गुरुग्रहणीं ज्याचा खग्रास झाला । तोचि ज्ञेय ज्ञान वांचूनी विनटला । अहमात्मा गिळूनि ठेला । आंगें जाहला परब्रह्म ॥ ८ ॥

एका जनार्दन म्हणे । यापरि गा गुरुग्रहणें । स्वयें आंगें परब्रह्म होणें । खत फाडणें विषयाचें ॥ ९ ॥

यापरी गुरुग्रहणीं जो खरा । तेणें अकार उकार मकार । निरसुनी प्रणवांच्या विकारा । अर्धमात्रा धरावी ॥ १० ॥

अर्धमात्रा अर्धोदयो । तेथें नाहीं उत्पत्तिस्थितीचा प्रलयो । ब्रह्मी ब्रह्मत्वाचा लयो । पूर्ण अन्वयो अर्धोदयाचा ॥ ११ ॥

आइका अर्धोदयाची कथा । प्रपंच एक जाहला होता । हे समूळ मिथ्या वार्ता । पुढें होईल मागुता । हें कदा कल्पांतीं घडेना ॥ १२ ॥

अर्धोदयो अर्ध मात्रा । हा पुण्यकाळ परम पवित्रा । एका जनार्दनीं पूर्ण यात्रा । चिदचिन्मात्रा प्रबोध ॥ १३ ॥

डेरा पाहिला गा ये राय हो । अंबेचे रंगणीं डेरा पाहिला तरी । त्या डेरियाची कथा । सावध ऐका आतां । जे पाहणें पाहते पाहतां । या तिहीं ते तत्त्वतां पाहों जाणें ॥ १४ ॥

जे अनादि निजशक्ती मोहिनी । महामाया माय राणी । डेरा मांडिला तिचे रंगणीं । अती विचक्षणी ममाभिमानी ॥ १५ ॥

कर्ण कुमारीच्या हातीं । डेरीया आणिली औट वोली माती । संकल्प कुल्लाळाचे हातीं । डेरा अती निगुती । गुणाचा केला ॥ १६ ॥

कुंडीं घातला वैश्वदेवो । बुडीं कर्म काष्ठें लाविती पाहा हो । बुद्धीसी ठेउनी ब्रह्मदेवो । डेरा निर्वाहो मांडिला ॥ १७ ॥

संकल्पविकल्पीं घातला चंद्र । ग्रहणीं घातलाजी इंद्र । पळसासवें लाविला उपेंद्र । सर्वाभिमानी बैसविला ॥ १८ ॥

वरुण ठेविला रस उत्पत्ती । प्रजा उत्पत्ती प्रजापती । यम ठेविला अधोगती । नरकोत्पत्ती गुदद्वारीं ॥ १९ ॥

अश्विनीदेवें सोडिली घानी । ते येउनी बैसले घ्राणीं । डेरिया स्पर्शाचा स्पर्श मनीं । ते काया वारेनीं धरिलीसे ॥ २० ॥

अन्नपानाच्या पचनीं । जठरीं ठेविला जठराग्नी । प्राणापान भाते दोन्ही । फुंकिती अनुदिनीं अहोरात्र ॥ २१ ॥

पंचभूतांचे चोहटा । चारी भूतग्राम येती हाटा । जन्ममरणाचिया पेठा । वसती उद्भटा कर्माकर्मे ॥ २२ ॥

रोम सुमनाचिया माळा । शोभती डेरियाच्या गळां । तिही अवस्था सोहळा । वेळोवेळीं भोगिती ॥ २३ ॥

चहुं पुरुषार्थाचे शेले । चहूं मुक्तीचे ध्वज उभारिले । हरिभक्तीचें फरश बांधिलें । डेरा तारूं लागलें रामनामाचें ॥ २४ ॥

अनुहात डौराचा नाद । तेथें वेदांचे वेदानुवेद । सिद्धान्त बोध त्याचे शब्द । डेरा प्रसिद्ध अवतरला ॥ २५ ॥

या डोरिया बाहेर जो निघाला । तोचि दादुल्याचा दादुला । डेरिया आंत जो अडकला । तो तो गेला अधःपाता ॥ २६ ॥

जो रामनामाचें तारूं धरी । तो रिघे डेरिया बाहेरी । जो पडे निंदेच्या घरामाझारीं । तो अघोरी पचिजेत ॥ २७ ॥

एका जनार्दन म्हणे । ऐसी डेरियाची लक्षणें । डौरकार जालों याकारणें । डौर वाहुनी सांगणें । निजहितार्थ ॥ १२८ ॥

भारुडे

स्तोत्रे
Chapters
आंधळा चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार... अंबा अयोध्येचा हो देव्हारा माझे कुळीची कुळस्वामिनी बहिरा जालो या या जगी संसार नगरी बाजार भरला भाई अलक्ष लक्ष मी भिकारी आम्ही परात्पर भिकारी चौदेहांची घेऊनी दीक्षा चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा अलक्ष लक्ष पाहवेना आम्ही परात्पर देशी नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी भूत जबर मोठे गं बाई आंधळा पांगळा आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु आंधळा पांगळा दाते बहु असती परि भवानी मी तुझा भुत्या खरा ... पंधरा सतरांचा सतरांचा हा ... चोपदार आला चोपदार आला ॥धृ... मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ... सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र... एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ ... सफेद कलंदर फकीर ।बाबा सफे... फकीर फकीर फकीर गाय अगा ते परम शुभ ऐक । लाभ द... आरता येरे धाकुट्या मुला ।... संचित बरवें लिहिलें । भाग... जोहार मायबाप जोहार । सकळ ... जोहार मायबाप जोहार । मी स... अयोध्येचा हो देव्हारा । आ... चल चल चल । निरंजन जंगलका ... पलखम्यानें चार जुग ज्यावे... संसार बाजेगिरी देख । दुरल... चल चल चल । याद करो गुरु ग... सुनो संत सज्जन भाई । हम त... प्राप्ती एक भजन विरुद्ध ।... सगरमें बाजी पतालमें बाजी ... संचित बरवें लिहिलें । भाग... लगे ढोल लगे ढोल । जरी तुझ... श्रीकृष्ण माया जी पाहे । ... गौळण गौळण गौळण होळी जागल्या जागर जंगम जोगवा जोहार जोशी जोशी जोशी अष्टपदी भटीण भटीण बैल छापा डोहो गाय गोपाळ हळदुली कहाणी कंजारीण कोल्हाटीण कुंटीण कुत्रें लग्न मुलगी नीति पांखरू पिंगळा महाद्वारीं बोली बो... पिंगळा पिंगळा पिंगळा पोपट रहाट सर्प सासुरवास सासुरवास शंखीण डंखीण शंखीण डंखीण शिमगा सौरी सौरी सौरी सौरी सौरी सौरी सौरी स्वप्न थट्टा टिटवी विंचू व्यापार आडबंग बाहुलें भूत भूत धांवा धांवा द्रौपदीचा धांवा किल्ला कोडें कोडें कोडें नवल नवल नवल नवल नवल नवल नवल पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाळणा पाळणा पाळणा पाळणा अभयपत्र अर्ज अर्जदस्त विनंतीपत्र थाक टिळा अभयपत्र अर्जाचा जाब जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार मायबाप जोहार । याच ... जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार ताकीदपत्र पत्र कौलपत्र कौल जमाखर्च जाबचिठ्ठी नानक नानक जोगी चिरंजीवपद बुलबुल भांड भांड भांड भांड फुलवरा फकीर फकीर फकीर मेसाबाई हुशारी हापसी गारुडी गारुडी गारुडी गारुडी गारुडी गारुड गावगुंड गावगुंड दरवेश यलमा सटवाई मरीआई महालक्ष्मी महालक्ष्मी गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ अंबा महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण जागल्या जागल्या डौर अक्कल बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी फुगडी फुगडी वैदीण वैदू कानोबा खेळिया कोडे कोल्हाटी कोल्हाटीण मल्हारी माळी मानभाव मानभाव मांग मुका नकटी नानक नवलाई पिसा पिसा पोर संसार संन्यास सर्प सौरी सौरी वाघ्या वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वटवाघूळ वेणु