Get it on Google Play
Download on the App Store

जोहार

जोहार मायबाप जोहार । तूं कोण्या गांवींचा महार ।

पुसाल जरी साचार । तरी सादर परिसा की जी मायबापा ॥ १ ॥

निराकार माझा मुळचा ठिकाणा । भक्तासाठीं सोडिला जाणा ।

वस्ती करूं कायापुरीच्या खुणा । सांगेन की जी मायबाप ॥ २ ॥

जोहार मायबाप जोहार । मी पारवतीच्या गळ्याचा हार ।

ईश्वराचा कारभार । मज नफराचे शिरीं की जी मायबाप ॥ ३ ॥

अखंड दारीं पडला असतों । प्रेमाचा तुकडा मागून खातों ।

सारी रात्र गोंवरापाशीं जागतों । धन्याला दुवा देतों की जी मायबाप ॥ ४ ॥

तुम्ही मुळींचा ठाव सोडूं नका । धन्याला तुम्ही विसरूं नका ।

विसरल्यास पावाल धक्का । अंतकाळीं की जी मायबाप ॥ ५ ॥

वस्ती करूं आम्ही साचे । समस्त कुळवाडी नगरीचे ।

पैके टाका धन्याचे । बाकी शेकूं नका की जी मायबाप ॥ ६ ॥

शेवटीं पट्ठी झाली । आसामीवर द्वाही दिधली ।

पैल मज नफरासी आज्ञा केली । धांडोरा पिटीन की जी मायबाप ॥ ७ ॥

तो मनाजी फितवेखोर । येणें थोर लाविला घोर ।

और बुधजीबावा आपुला पोर । नाहीं तरी धनी कोपतील की जी मायबाप ॥ ८ ॥

कामाजी बाजीनें काय बरवें केलें । आपआपणासी नाडिलें ।

नाहीं यासी विचारिलें । मागें पुढें की जी मायबाप ॥ ९ ॥

मदाजीबाजीचें तरी वेगळेंच थोंब । सारा देतां उगीच बोंब ।

धन्यासी कधीं सोम । जन्म नाहीं की जी मायबाप ॥ १० ॥

अहंताजी महाजन तो आपुले ठायीं । नगर नागविलें याचे पायीं ।

पहातां कवडी याचे पदरीं नाहीं की जी मायबाप ॥ ११ ॥

पहा दंभाजी चौधरी । याची वेगळीच भरोवरी ।

आतां किती याचे घरीं । वेरझारी शिणावे की जी मायबाप ॥ १२ ॥

विकल्प शेट्या तरी सदाच घाण । अखंड पाहती आपुला मान ।

तोंडावरी बैसले जेव्हां वहाण । मग डोळे पुसतील जी मायबाप ॥ १३ ॥

जिवाजीबावा म्हणें कशांत काय । आम्ही त्यात पहाणें ।

आतां कोण कोणाचीं दुखवूं मनें । शेवटीं त्यांशींच पुसणें होईल की जी मायबाप ॥ १४ ॥

शिवाजीबवा म्हणें कशांत काय । तरी सर्वही कारभार त्याचाचि हाय ।

त्यांवांचून हालेल पान काय । तेंही विचारा की जी मायबाप ॥ १५ ॥

तरी हे रज तम सात्त्विकी बाजी । हा सकळ उभारा याचाच की जी ।

तरी हे दिले राखावी राजी । सत्त्वाची बाजी की जी मायबाप ॥ १६ ॥

निवृत्तीपासून प्रवृत्ति जाहली । ही अनुभवाची खूण बाणली ।

साधुसंतांस की जी मायबाप ॥ १७ ॥

पैल ते वासना आवजीनें फितुर केला । घरचा भेद बाहेर दिला ।

हा विचार माझ्या धन्यास कळला । धनी कोपेल की जी मायबाप ॥ १८ ॥

आशाई आवाजीचा मोठा चाळा । ज्यासी त्यासी घालिती डोळा ।

मागतसे नित्य नवा गोळा । परि सर्व जड जाईल की जी मायबाप ॥ १९ ॥

निंदाई आवाचें तोंड मोठें । मागें मागें मोडिती बोटें ।

म्यां सांगितलें हट्ट टाकून बोलतीस नेटें । तूं कोण गे बुरसे की जी मायबाप ॥ २० ॥

चिंताईची तरी खालतीच मान । जेव्हां तेव्हां घालिती घोन ।

म्यां सांगितलें तुज पुसतें कोण । वोंगळें येथें कां बैसलीस की जी मायबाप ॥ २१ ॥

आतां हें घर माझ्यानें हिंडवेना । या बायकोचे कर्तव्य कळेना ।

जो यासी आवरी तो शहाणा । असे की जी मायबाप ॥ २२ ॥

तुम्हीं खाल्ले रानीं सांगतां गोष्टी । येईल धन्याची चिठ्ठी ।

पैक टके उठाउठी । बाकी सेवूं नका की जी मायबाप ॥ २३ ॥

तुम्ही मागें मागें फार बोलतां । हें कळेल माझ्या धन्यास वार्ता ।

तरी दरबारासी जातां । मग मोठें कठीण की जी मायबाप ॥ २४ ॥

तरी हा दहा पाटलांच गांव । पंचवीस प्रजांची हाव ।

पन्नासाचे नांव । म्यां कीती घ्यावें की जी मायबाप ॥ २५ ॥

जंववरी चालती भर वस्ती आहे । तंववरी कराल तितुके होय ।

यांत डावा डोल झालिया कराल काय । सांगा की जी मायबाप ॥ २६ ॥

मग चालतां पायाचे वेंगडे वळती । जळत्या खांबासी बांधिती ।

तेथें मग आपुला सारथी । कोणी नाहीं की जी मायबाप ॥ २७ ॥

तरी पांच मिळून विचार करा । प्यादा जपादा हातीं धरा ।

नाहीं तरी पडेल फेरा । लक्ष चौर्‍यांयशीचा की जी मायबाप ॥ २८ ॥

आतां आम्ही सांगतों तें ऐका । तुम्ही डोळे झाकूं नका ।

तुम्हांला जोडेल निजसखा । वैकुंठनाथ की जी मायबाप ॥ २९ ॥

मी नफर आहे गाढा । तोडीन यमाच्या दाढा ।

उघडीन वैकुंठीच्या पेठा । नाम कडाडा गर्जेन की जी मायबाप ॥ ३० ॥

मी नफर नोहे खोटा । विघ्न लावीन बारा वाटा ।

नित्य मुक्तीच्या चोहोटा । राहतों की जी मायबाप ॥ ३१ ॥

आजि होय होय होय । आधीं होते एक । एकापासून जाहले अनेक ।

शेवटीं कांहीं नाहीं देख । शून्याशून्य मिळालें की जी मायबाप ॥ ३२ ॥

एका जनार्दनीं जोहार । येणें केला सारासार विचार ।

मोडिला अविद्येचा थार । परब्रह्मीं वास करणें की जी मायबाप ॥ ३३ ॥

भारुडे

स्तोत्रे
Chapters
आंधळा चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार... अंबा अयोध्येचा हो देव्हारा माझे कुळीची कुळस्वामिनी बहिरा जालो या या जगी संसार नगरी बाजार भरला भाई अलक्ष लक्ष मी भिकारी आम्ही परात्पर भिकारी चौदेहांची घेऊनी दीक्षा चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा अलक्ष लक्ष पाहवेना आम्ही परात्पर देशी नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी भूत जबर मोठे गं बाई आंधळा पांगळा आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु आंधळा पांगळा दाते बहु असती परि भवानी मी तुझा भुत्या खरा ... पंधरा सतरांचा सतरांचा हा ... चोपदार आला चोपदार आला ॥धृ... मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ... सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र... एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ ... सफेद कलंदर फकीर ।बाबा सफे... फकीर फकीर फकीर गाय अगा ते परम शुभ ऐक । लाभ द... आरता येरे धाकुट्या मुला ।... संचित बरवें लिहिलें । भाग... जोहार मायबाप जोहार । सकळ ... जोहार मायबाप जोहार । मी स... अयोध्येचा हो देव्हारा । आ... चल चल चल । निरंजन जंगलका ... पलखम्यानें चार जुग ज्यावे... संसार बाजेगिरी देख । दुरल... चल चल चल । याद करो गुरु ग... सुनो संत सज्जन भाई । हम त... प्राप्ती एक भजन विरुद्ध ।... सगरमें बाजी पतालमें बाजी ... संचित बरवें लिहिलें । भाग... लगे ढोल लगे ढोल । जरी तुझ... श्रीकृष्ण माया जी पाहे । ... गौळण गौळण गौळण होळी जागल्या जागर जंगम जोगवा जोहार जोशी जोशी जोशी अष्टपदी भटीण भटीण बैल छापा डोहो गाय गोपाळ हळदुली कहाणी कंजारीण कोल्हाटीण कुंटीण कुत्रें लग्न मुलगी नीति पांखरू पिंगळा महाद्वारीं बोली बो... पिंगळा पिंगळा पिंगळा पोपट रहाट सर्प सासुरवास सासुरवास शंखीण डंखीण शंखीण डंखीण शिमगा सौरी सौरी सौरी सौरी सौरी सौरी सौरी स्वप्न थट्टा टिटवी विंचू व्यापार आडबंग बाहुलें भूत भूत धांवा धांवा द्रौपदीचा धांवा किल्ला कोडें कोडें कोडें नवल नवल नवल नवल नवल नवल नवल पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाळणा पाळणा पाळणा पाळणा अभयपत्र अर्ज अर्जदस्त विनंतीपत्र थाक टिळा अभयपत्र अर्जाचा जाब जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार मायबाप जोहार । याच ... जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार ताकीदपत्र पत्र कौलपत्र कौल जमाखर्च जाबचिठ्ठी नानक नानक जोगी चिरंजीवपद बुलबुल भांड भांड भांड भांड फुलवरा फकीर फकीर फकीर मेसाबाई हुशारी हापसी गारुडी गारुडी गारुडी गारुडी गारुडी गारुड गावगुंड गावगुंड दरवेश यलमा सटवाई मरीआई महालक्ष्मी महालक्ष्मी गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ अंबा महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण जागल्या जागल्या डौर अक्कल बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी फुगडी फुगडी वैदीण वैदू कानोबा खेळिया कोडे कोल्हाटी कोल्हाटीण मल्हारी माळी मानभाव मानभाव मांग मुका नकटी नानक नवलाई पिसा पिसा पोर संसार संन्यास सर्प सौरी सौरी वाघ्या वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वटवाघूळ वेणु