पाईक
देह दान देउनी उदार मिरविले । स्वामीयासी केलें आपुलें घर ॥ १ ॥
घेउनी करवत आपुलेनी हातें । शरीर दोन भागातें केलें जिहीं ॥ २ ॥
देउनी राज्य धन जाहलोंसे भिकारी । भिक्षा निरंतरीं मागताती ॥ ३ ॥
एका जनार्दनीं पाईक ऐसे भले । स्वामीस मानले सर्वभावें ॥ ४ ॥